Monday, November 7, 2011


संवर्धन समाज विकास संस्था कारंजा, लाड

Click for English Language








FIRST ANNOUNSMENT
“बेंबळा नदी परिक्रमा”
नोव्हेंबर २०११
बिंदूतिर्थ (उगम स्थान, कारंजा लाड) ते रामटेक


गोदावरीच्या खोऱ्यामध्येबेंबळा, अडाण, अरुणावती नद्यांच्या उपखो-यात निसर्ग संवर्धन आणि स्थानीक लोकांचा रोजगारशाश्वत करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नरत आहोत. नदीच्या, त्यातील जैवविविधतेच्यासंवर्धनाचे कार्य करता करता आम्हाला हे शिकायला मिळाले की, नदीचे प्रश्न हे आसपासच्याअनेक घटकांमध्ये झालेल्या नकारात्मक बदलाचा परिणाम मात्र आहे. शेती, शेतक-यांचे सामाजीकप्रश्न, मासेमारांची झालेली वाताहत, जंगल, गवताळ पट्टे, पारंपरिक तलावांच्या प्रश्नांनाजोवर आपण समजून घेत नाही व छोट्या स्तरावर का होईना जोवर प्रत्यक्ष कृतीला चालना देतनाही तोवर आपल्या आसपासच्या प्रश्नांचा विळखा असाच वाढत जाणार आहे. ह्या प्रश्नांचाअभ्यास व्हावा, नदीला समजून घेता घेता आसपासचा निसर्ग समजून घेता यावा, ’नदी वाचनाची’ भारतील अर्थ व्यवस्थेचाकणा असलेल्या शेतकऱ्यांचे, शेतमजूरांचे, मजूरांचे हलाखीचे जीवन समजून घेण्यासाठी वसर्व सहमतीने उपाय योजना करण्याच्या निमित्ताने दिनांक नोव्हेंबर दरम्यान (तारखा लवकरच कळविल्या जातील) बेंबळा नदी परिक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. निसर्ग व सामाजीक अभ्यासक, सेवाभावीसंस्था कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी, पक्षी मित्र, छायाचित्रकार, सरकारी अधिकारीआणि निसर्गाबद्दल, स्थानीक ग्रामीण लोकांबद्दल आस्था असणाऱ्या (आणि दररोज १० ते १२ किलो मीटर चालण्याची तयारीअसणाऱ्या) तमाम जनतेला ह्यात आदराचे निमंत्रण आहे.
भ्रष्टाचाराच्या संदर्भातदेशभरात एक वातावरण तयार होत असतांना निसर्गाच्या, तलावांच्या, नदीच्या, शेतीच्या,शेतकऱ्यांच्या, मासेमारांच्या, नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असणाऱ्या निसर्ग मित्रांच्याप्रश्नांकडे दुर्लक्ष्य झालेले दिसत आहे. करोडो रुपये खर्चूनही भरून न येणारा निसर्गाच्याविनाशाचा व निसर्गाधारीत लोकांबद्दलच्या अनास्थेचा भ्रष्टाचार समाजाने गेल्या ३०-४०वर्षांमध्ये केला आहे. या सर्व मुद्यांबद्दल व्यापक जन जागृतीची आता गरज आहे. सोबतचस्थानीक माहितीच्या अभावानेच, अभ्यास आधारीत धोरणाचा स्विकार न करता रोजगार हमी योजनासारख्या योजना राबवल्या जात आहे. अशा परिस्थितीत नैसर्गिक संसाधनाच्या अभ्यास आधारीतनियोजनाला चालणा देण्याची गरज आहे.
नदी ही एक मध्यवर्तीनैसर्गिक घटक घेऊन निसर्ग, त्याच्याशी जोडलेले लोक व नदीच्या विविध घटकांसंदर्भातलीमाहिती गोळा करणे, स्थानीक लोकांशी चर्चा करुन प्रश्न जाणून घेणे व सर्वसहमतीची उपाययोजनाकरणे हा ह्या परिक्रमेचा मूळ गाभा आम्ही गृहीत धरत आहोत.
ह्या नदी परिक्रमेबद्दलच्यातयारी मध्ये आम्ही सद्या लागलेले आहोत. परंतू आपल्या तारखा आपण राखून ठेवाव्यात म्हणूनहे पहिले पत्र पाठवित आहोत.

सहभागी होण्यासाठी संपर्क साधा

संवर्धन समाज विकास संस्था
द्वारा डा. निलेश हेडा
शेतकरी निवास जवळ, वाशीम रोड, कारंजा (लाड)
जिल्हा वाशीम ४४४१०५ महाराष्ट्र
इमेल: nilheda@gmail.com
दूरध्वणी: ९७६५२७०६६६
वेब साईट: www.samvardhan.org.in